News & Updates

Page No: 1

Published In: Facebook Page

News Date: 04-Aug-2019

फ्रेंडशिप डे च्या खूप खूप शुभेच्छा !
फ्रेंडशिप डे च्या खूप खूप शुभेच्छा ! कॅफे कॉफी डे चे मालक सिद्धार्थ यांनी परवा ताणतणावामुळे आत्महत्या केली.जर त्यांच्या सभोवताली काही असे मित्र असते ज्यांच्याकडे त्यांनीआपलं मन मोकळं केलं असतं आणि मित्रांनी त्यांना धीर दिला असता, तर कदाचित उद्योगपती सिद्धार्थ आज आपल्यात असते.कर्ज अनेकांवर असतं परंतु म्हणून काही आत्महत्या हा त्यावर उपाय नाही.मैत्री ही मैत्री असते,तिला जात नसते,वयाचे बंधन नसते,गरीब-श्रीमंतीचा गंध नसतो.मित्र-मैत्रिणींच्या सहवासाचा निवांत कोपरा आयुष्यात असणं यासारखं सुख नाही.हे सुख सगळ्यांना भरभरून मिळो आणि आज पावसाच्या सोबतीने तुमच्या जिवाचे जिवलग तुम्हाला भेटोत !
Web Statistics